कायगाव टोका येथील आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे
मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्याच्या कुटुंबियांना शासनाने दिलेली आश्वासने राज्य सरकारने पाळली नाही. त्याच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कायगाव टोका येथे बलिदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्यात आले. राज्य शासन आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांशी 30 जुलै रोजी मंत्रालयात चर्चा करून प्रश्न मार्गी लावणार आहे, असे राज्य शासनाचे पत्र आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे अनेक मोर्चे काढण्यात आले. या दरम्यान जवळपास 42 आंदोलकांनी आरक्षणासाठी आत्मबलिदान केले. बलिदान करणार्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी आणि आर्थिक मदतीचे राज्य शासनाने आश्वासन दिले होते. पण शासनाने आश्वासन पाळले नाही. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ आज कायगाव टोका येथे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकामार्फत ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आज सकाळी 10 वाजता कायगाव फाट्याजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रसंगी गंगापूरचे तहसीलदार राज्य शासनाचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र घेऊन आले. 30 जुलैला या संदर्भात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे पत्रात नमूद केल्याने आंदोलकांनी 11 वाजता आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनाचे नेतत्त्व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील, आप्पासाहेब पुडेकर, योगेश शेळके, गोडसे पाटील, निलेश ढवळे, राहुल पाटील, सुनील कोतकर, किरण काळे, शुभम पेढे पाटील, प्रशांत ब्रह्मराक्षस यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी कायगाव टोका परिसरात तीनशे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
काकासाहेब शिंदेंच्या स्मृतीदिनी आंदोलन
मराठा समाजाला आरक्षण देण्यज्ञात यावे यासाठी कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पुलावर आंदोलन सुरू असताना काकासाहेबशरशिंपदे या कार्यकर्त्याने पुलावरून उडी मारून आत्मदहन केले होते. त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाने व्याप्ती घेतली होती. आरक्षणासाठीचा पहिला बळी काकासाहेब शिंदे यांच्या रुपाने गेला होता. या पुलाला काकासाहेब शिंदे यांचे नाव दिले गेले आहे. याच पुलावर आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंदोलन करण्यात आले. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानानंतर राज्यभरात मराठा आरक्षणासाठी बलिदान करण्याचे प्रमाण वाढल होते.
आंदोलनाचा इशारा
30 जुलै रोजी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांशी व मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीत शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मराठा क्राीं मोर्चाच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रमेश केरे पाटील यांनी दिला आहे.














